प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे,या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंगमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा चे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शैक्षणिक सचिव विवेक शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले तसेच कार्पोरेट ट्रेनर-ऑल इंडिया ॲग्री बिझनेस अँड टेक्नॉलॉजी कन्सल्टंट नितीन सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा,नियमावली आणि अभ्यासक्रम संरचना याबद्दल माहिती दिली.
प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना संस्था स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची संस्थेची होत असलेली प्रगती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बजावलेल्या कामगिरीचा तसेच मिळवलेल्या यशाचा उल्लेखनीय आलेख याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध योजना तसेच शिष्यवृत्ती आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी संस्थेमार्फत सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याचे सांगितले.
विभाग प्रमुख-प्रा.निर्मल कोठारी,प्रा.शुभम शेळके, प्रा.स्नेहा शेगर,प्रा.अमोल खातोडे,प्रा.अमोल भोर,प्रा.निलेश नागरे,डॉ.शरद पारखे यांनी आपापल्या विभागाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या इंडक्शन प्रोग्राममध्ये उद्योग,शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना तांत्रिक सत्रे,व्यक्तिमत्व विकास,संवाद कौशल्य,प्रेरणादायी व्याख्याने,क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे सर्वांगीण मार्गदर्शन करण्यात आले.
नितीन सोनवणे यांचे ड्रोन टेक्नॉलॉजीवरील मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना ड्रोनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
चैतन्य डहाळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा.सचिन पोखरकर यांनी ‘रोडमॅप टू प्लेसमेंट’ या विषयावर विद्यार्थ्यांना करिअर संधी,नोकरी मिळवण्यासाठी तयारी आणि उद्योगांच्या अपेक्षा याबाबत उपयुक्त माहिती दिली.
क्रीडा संचालक एचपी नरसुडे व बी एन हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व क्रीडा संस्कृती याबाबत ओळख करून देत मार्गदर्शन केले.
प्रा.सचिन शेळके यांचे 3D प्रिंटिंग या विषयावर व्याख्यान नवीन तंत्रज्ञान व त्याबद्दलच्या करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली.त्यानंतर अक्षय कुलकर्णी व अनुज जाल्दवाड यांनी रोबोटिक्स व ऑटोमेशन या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरण सोहळ्याने झाला.समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या भावी करिअर घडविण्यासाठी आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी करावा असे आवाहन केले.
या इंडक्शन प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा,आत्मविश्वास आणि प्रेरणा जागृत झाली.विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान,करिअर मार्गदर्शन तसेच शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी केले तर आभार विभागप्रमुख प्रा.राजू वाकळे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments