Type Here to Get Search Results !

समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये वंदेमातरम गीतनिर्मिती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

बंकिमचंद्र चटर्जी यांनी तयार केलेल्या वंदेमातरम गीतनिर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून वंदेमातरम गीत निर्मितीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव राबवण्यात येत आहे.या माध्यमातून एकता,त्याग आणि मातृभूमी विषयी असलेल्या मूल्यांना पुन्हा पुष्टी देणे हा हेतू आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देशभक्ती, एकता आणि राष्ट्र सेवेची भावना वाढवणाऱ्या उपक्रमाचे आयोजन प्रभावीपणे करण्यात येत असून महाविद्यालयामध्ये विद्यार्थी,प्राध्यापक,कर्मचारी यांच्या सहभागातून वंदेमातरम या गीताचे सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते.

इंजीनियरिंग,पॉलिटेक्निक,बी सी एस,आयटीआय,एमबीए,फार्मसी,जुनियर कॉलेज,लॉ,गुरुकुल आधी संकुलातील सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.उपस्थितांना संबोधित करताना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले की जनमानसात देश भावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावली असून राष्ट्रहिताच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती,प्रचार व प्रसार करण्यासाठी महाविद्यालयातील तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

यानिमित्ताने संकुलामध्ये रांगोळी स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,पोस्टर मेकिंग स्पर्धा आदि स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments