Type Here to Get Search Results !

समर्थ संकुलात पुणे झोनल स्पर्धा व निवड चाचणी संपन्न, २७ खेळाडूंची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे व समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे झोनल बास्केटबॉल व खो-खो स्पर्धा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये संपन्न झाली. 

अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीचे विभागीय प्रमुख विशाल कुलकर्णी व संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेसाठी मुंबई,पुणे,अहिल्यानगर,रायगड,ठाणे व पालघर या सहा जिल्ह्यातून ६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

 स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-

खो-खो (मुले):

प्रथम क्रमांक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे

द्वितीय क्रमांक-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे

तृतीय क्रमांक-अभिनव एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, नऱ्हे

खो-खो (मुली):

प्रथम क्रमांक-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे

द्वितीय क्रमांक-समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे

तृतीय क्रमांक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे

   या स्पर्धेमध्ये समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी व समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे या दोन्ही महाविद्यालयांमधून आंतरविभागीय स्पर्धेसाठी पुणे विभागीय संघामध्ये २७ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके यांनी दिली.

या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पुणे विभागाचे सचिव एच पी नरसुडे,क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी, राहुल अहिरे,डॉ.सचिन भालेकर,डॉ. मंगेश होले, डॉ.सचिन दातखिळे,प्रा.सुजित तांबे,प्रा.नितीन महाले,प्रा. गणेश लामखडे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments