Type Here to Get Search Results !

यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवांतर्गत तालुकास्तरीय लेझीम व प्रश्नमंजुषा स्पर्धेत ओतूर नंबर एक.......



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

 खानापूर तालुका जुन्नर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत लहान गट लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक आला प्रश्नमंजुषेत सहभागी विद्यार्थी राजवर्धन सुपेकर आणि युगंधर मंदिलकर जिल्हास्तरासाठी हे दोन्हीही संघ पात्र झालेले आहेत 

 अशी माहिती मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी दिली.


 तसेच बुद्धिबळ स्पर्धेत तालुका स्तरावर राजवर्धन सुपेकर हा विद्यार्थी बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर तर पहिली दुसरीच्या गटात विभूम घोलप हा विद्यार्थी वेशभूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला.

 या स्पर्धेतील सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका माधुरी शेटे,वनिता जाधव, सतीश नलावडे,सुदेष्णा गाढवे,उषा भवारी,ज्योती शिरसाठ, रूपाली गायकर,योगिता बुट्टे, संगीता ढाकणे यांनी मार्गदर्शन केले.

 त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन डुंबरे सदस्य नितीन पानसरे जितेंद्र घुले प्रतीक्षा ढोकळे पूजा दिवेकर विद्या हाडवळे कविता डुंबरे सरपंच छायाताई तांबे उपसरपंच प्रशांत डुंबरे 

 शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, केंद्रप्रमुख कमलाकांत मुंढे,

 गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, विस्तार अधिकारी गोडसे, शाळेचे सर्व पालक वर्ग मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments