Type Here to Get Search Results !

ग्रामीण कवी श्रीराम घडे संपादित डोरलं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न.



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तसेच राजयुवा प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय कुसुमाग्रज कवी संमेलन आयोजित केले होते तसेच 

राजयुवा प्रकाशनामार्फत चार प्रतिनिधिक पुस्तकांचा समावेश होता. त्यात ग्रामीण कवी श्रीराम घडे यांनी संपादित केलेल्या "डोरलं" या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन पाठ्यपुस्तकातील कवी वैभव धर्माधिकारी,विस्तार अधिकारी श्रीमती सुभा लोंढे,वनविभाग अधिकारी मा.लक्ष्मण शिंदे,भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विशाल शिरसट, तसेच कार्याध्यक्षा मा.शिल्पा मुसळे, सचिव योगेश हरणे सर आणि राजयुवा प्रकाशनाचे प्रकाशक मा.गौरव पुंडे या आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.

ग्रामीण कवी श्रीराम घडे डोरलं या प्रतिनिधिक पुस्तकाचे संपादक असून त्यांनी तब्बल 58 युवा आणि जेष्ठ कवींना एकत्रित करून हे पुस्तक संपादित केले.



त्यांनी आपल्या मनोगतातून कवी वर्गाची मने जिंकून आपल्या डोरलं या कवितासंग्राहा मधून प्रेम ,भावना,विश्वास,आदर ,

काळजीअशी अनेक नात्यांची गुंफण करून घेतली आहे.तसेच प्रेम हे अगदी सरळ सोप्या भाषेत सहज व्यक्त केले आहे.प्रेमात ,ध्येयात,स्वतःच्या स्वप्नासाठी स्वप्नपूर्तीच्या मार्गावर स्वतःला पूर्णपणे सर्वस्व पणाला लावलेल्या प्रत्येक ध्येयवेड्या,प्रेमवेड्या, संघर्षवेड्या अशा आणणाऱ्या त्यांच्या पत्नीस यांनी डोरलं हा कवितासंग्रह अर्पण करून आपल्या भावना अंतरमनाने व्यक्त केल्या आहेत.

यावेळी ४० निमंत्रित कवींचे कवी संमेलन देखील पार पडले.

या कार्यक्रमाचे निवेदन श्रीशैल सुतार तसेच सारिका सासवडे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन योगेश हरणे,पल्लवी पवार , युवा कवी तुषार पालके,मयुरी लायगुडे,संगम उबाळे, गौरव पुंडे, ज्योती भंडारी यांनी केले.


ग्रामीण कवी श्रीराम घडे यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments