Type Here to Get Search Results !

जि प प्रा शाळा खटकाळे शाळेत महात्मा फुले, सावित्रीबाई यांना मानवंदना




खटकाळे: जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी पेसा ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खटकाळे येथे

आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, तसेच 'बालिका दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान करून

'स्त्री शिक्षणाचा जागर करत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा दिला.

आर्यन गागरे या विद्यार्थ्याने महात्मा ज्योतिराव फुले व तेजस्विनी गागरे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची यांची वेशभुषा केली होती.आरुषी मोरे, राखी सांगडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक नाटिका सादर केली.मुख्याध्यापिका मनीषा काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. दिपक मुंढे यांनी सूत्रसंचालन केले.

 कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिताराम गागरे, उपाध्यक्ष हिना शेख, सुमित्रा गागरे, हिराबाई भवारी, अर्चना मोरे,सुवर्णा मोरे, योगेश मोडक, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments