Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे

न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोहे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्वागतगीत व ईशस्तवनाने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या शिक्षिका सौ. बोरसे मॅडम होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ. सुवर्णाताई धादवड मॅडम उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, बालविवाह, विधवांवरील अन्याय याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन शक्य आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विचारमंच सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमास गोहे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अश्विनीताई शिंगाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. नरेश मधुकर कसबे, श्री. दामू गभाले, श्री. नामदेव गभाले, श्री. भागु गाडेकर, श्री. तावजी बांबळे, सौ. संध्या कसबे, सौ. रूपाली करवंदे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. औदुंबर सरवदे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. भानुदास उगले सर, श्री. सुदाम लोहकरे सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षण, समानता व सामाजिक न्यायासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. जयंतीनिमित्त अध्यक्षीय भाषणातून सामाजिक जाणीव जागृत करणारे संदेश देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश ढोबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नवनाथ भूमकर सर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments