घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव- घोडेगाव मध्ये जुगार अवैध दारू विक्रेते यांचा सुळसुळाट झाला असून प्रशासन मात्र पाहण्याच्या भूमिकेत दिसत आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे हातभट्टी, जुगार, मटक्यामुळे दहशतीचे वातावरणपोलिस ठाणे हद्दीत असून खुलेआम सुरू असलेल्या हातभट्टी, जुगार अड्डे, मटका आणि यामुळे युवक व्यसनाच्या गर्तेत अडकत असून अनेक कुटुंबे उध्दवस्त होत आहेत. तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवैध दारू पिणा-या टोळ्यांमुळे भांडणे, मारामाऱ्या, कौंटुंबिक हिंसाचार, चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला. घोडेगाव सहा नंबर वार्ड मधील मंचर घोडेगाव रस्ते लगेच जुगार अड्डा चालू असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे तरी देखील यावर कारवाई होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले प्रशासन कोणत्या दबावाला बळी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी कारवाई करायचीच नाही का? का कुणाच्या दबावाखाली कारवाईच करायची नाही? इतके स्पष्टपणे अवैध धंदे सुरू असताना पोलिस प्रशासन कारवाई का करत नाही? कोणाच्या दबावाखाली ही कारवाई रोखली जात आहे का? या धंदयांमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तिंना अभय मिळत असल्याची जोरदार चर्चा नागरिकात सुरू आहे.
तसेच घोडेगावातील सामाजिक कार्यकर्ते विकास कामाला खोट घालत असून मात्र या अवैद्य धंद्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचे घोडेगावच्या नागरिकांचे म्हणणे आहे


Post a Comment
0 Comments