Type Here to Get Search Results !

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, मासिक पाळी स्वच्छतेसाठी पस्तीस शाळांना वेंडिंग व डिसपोजल मशीन वाटप व मार्गदर्शन.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

डिसेंट फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून व Ashland, International Speciality Products (India) Private Limited (CSR Initiative) यांच्या सहकार्याने शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी एक स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाअंतर्गत पस्तीस शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व डिसपोजल मशीन बसविण्यात येणार आहेत . यामुळे विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. तसेच मुलींमध्ये मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर होऊन स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.



या कार्यक्रमात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मासिक पाळीतील घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता व स्वसंरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले . यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व स्वतःच्या आरोग्याबाबत जबाबदारीची भावना निर्माण झाली.



याशिवाय पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन तसेच “कळी उमलताना” या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यामुळे आरोग्यविषयक जाणीवेसोबतच पर्यावरण संवर्धनाबाबतही विद्यार्थिनींमध्ये सजगता वाढण्यास मदत झाली.



बारव ,निरगुडे ,आपटाळे ,इंगळून ,चिंचोली ,सावरगाव यासह पस्तीस शाळांमध्ये हा उपक्रम रबविण्यात आला.  

हा उपक्रम शाळेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असून, शाळेच्या वतीने डिसेंट फाउंडेशन व Ashland, International Speciality Products (India) Private Limited यांचे मनःपूर्वक आभार मानले .


याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री अशोक लांडे साहेब , डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ.एफ.बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, डॉ.संपदा तोडकर ,परिचारिका उज्वला गवळी ,छाया पाटील आदी मान्यवर शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्तित होते .

Post a Comment

0 Comments