Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात “संशोधन, नवोन्मेष व बौद्धिक संपदा हक्क” विषयावर कार्यशाळा संपन्न


प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर

जुन्नर :श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, रसायनशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,विद्यार्थी विकास विभागातर्फे “संशोधन,नवोन्मेष व बौद्धिक संपदा हक्क:विज्ञान व तंत्रज्ञानातील समन्वयात्मक दृष्टिकोन” या विषयावर दि १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी व प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब माने होते. तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा विक्रम रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. 



 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.ज्ञानेश्वर शिंदे प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी पुणे यांनी "विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि नवोपक्रम" या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी आधुनिक संशोधनातील संधी, नवकल्पनांचे महत्त्व आणि उद्योग-संस्थांमधील सहकार्य याविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ.मन्सूर मौलवी यांनी "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रसायनशास्त्र साधने" या विषयावर सत्र घेतले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रसायन माहिती शास्त्रातील आधुनिक साधनांचा संशोधनात कसा उपयोग होतो याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.



तिसऱ्या सत्रात डॉ.संतोष शिंदे, हुतात्मा बाबू गेनू सायन्स कॉलेज मंचर यांनी "संरक्षणाची शक्ती:आयपीआरची मूलतत्त्वे समजून घेणे" या विषयावर पेटंट,कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि ट्रेड सिक्रेट्स यांची माहिती दिली. 

समारोप सत्रात डॉ.साधू कोळेकर अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांनी "मटेरियल सिंथेसिस आणि कॅरेक्टरायझेशन तंत्रे" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध विश्लेषण तंत्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यशाळेत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील महाविद्यालयामधील एकूण १०४ विद्यार्थ्यांनी तसेच बहुसंख्य प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.सर्व सत्रे अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली.कार्यशाळेचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संतोष काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.गीतांजली गाढवे तर आभार प्रदर्शन प्रा.ऋतुजा तांबोळी यांनी केले.

 प्रा.संदिप थोरवे यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले.आयक्यूएसी समन्वयक डॉ.विनायक लोखंडे तसेच प्रा.विकास कदम,प्रा.अमोल दप्तरे आणि रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयक जाणीवा वृद्धिंगत करणारा व भविष्यकालीन शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देणारा कार्यक्रम झाला.

Post a Comment

0 Comments