प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना आमंत्रित करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना शैला रांजणे मॅडम यांनी केली.इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांचे गट करून गटांमध्ये कशाप्रकारे विद्यार्थी निपुण होतील व त्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवावेत ह्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा व माहिती श्रीमती सुलोचना बेंढारी यांनी दिली.निमंत्रित मातांपैकी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सुनंदा करवंदे व इतर काही महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. बाकी महिलांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली. मुख्याध्यापिका सौ वीणा सदगीर यांनी राजमाता जिजाऊ. सौ सावित्रीबाई फुले अशा थोर महिलांच्या कर्तृत्वाच्या यशोगाथा थोडक्यात सांगितल्या. जमलेल्या मातांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे. अभ्यास करून घेणे खूप महत्त्वाचे आहे हे पटवून देऊन १०० % विद्यार्थी १००% निपुण झाले पाहिजे असे प्रतिपादन श्रीम चंद्रकला शिंगाडे यांनी केले.
शाळेतील मुलांच्या अष्टपैलू विकासासाठी वेगवेगळे विविध उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमांची माहिती श्रीमती अनिता लांडे मॅडमने सर्वांना दिली.सर्व मातांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त केली. श्री.निलेश क्षीरसागर सर यांनी आलेल्या सर्व मातांचे व जमलेल्या पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment
0 Comments