Type Here to Get Search Results !

कुमशेत शाळेत “आठवडी बाजार” उपक्रम उत्साहात संपन्न

 


जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे आंतरराष्ट्रीय गणित दिनानिमित्त दप्तरमुक्त आनंददायी शनिवार अंतर्गत “आठवडी बाजार” हा उपक्रम अत्यंत उत्साहात व शैक्षणिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहारातून समजाव्यात तसेच खरेदी-विक्री, नफा-तोटा आणि पैशाचे महत्त्व कळावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.



या उपक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. शिवकन्या वाणी माजी अंगणवाडी सेविका सौ. सुलोचना डोके व उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास गावचे सरपंच रवींद्र मधुकर डोके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशितोष दिलीप डोके, पत्रकार राजेश डोके, माजी पी.डी सी बँक अधिकारी सुभाष डोके, कृ. सो. शि बु. संचालक शिवाजी डोके,विकास दुधाळ, चेअरमन हिरामन डोके, मा. शा. व्य स अध्यक्ष वैभव डोके,अमोल डोके, अंकुश डोके, वैशाली डोके, सोनाली डोके, रेणुका डोके, दिलीप डोके, आंचल डोके, प्रजा डोके, निलम भास्कर, मंदा नायकोडी, सुलोचना डोके, हर्षदा डोके, मयूर भगत, समीर डोके, महेंद्र वाणी, सोन्याबापू वाणी, अजीजा इनामदार यांसह अंगणवाडी सेविका प्रियंका डोके, मदतनीस हर्षदा डोके, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भाजीपाला व फळे खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी विविध फळे व भाजीपाल्याचे आकर्षक स्टॉल उभारले.



यामध्ये शिवांश डोके (कोथिंबीर), आरोही भगत (भोपळा), आरूष डोके (भेंडी), आरव व रिया दुधाळ (सोनकेळी व लिंबू), देवांश डोके (विविध भाजीपाला), स्वरा डोके (शेवगा), नित्या व श्रुती डोके (कलिंगड), पूर्वा व साई डोके (शेवगा), नयन डोके (चिंचा), समर्थ वाणी (पालक), सह्याद्री डोके (मेथी), मानसी वाणी (काकडी), कृष्णा डोके (बटाटे), तनुज डोके (शेवगा), पर्णवी डोके (लसूण), अविरत डोके (कढीपत्ता), विराज वाणी (मोड आलेली कडधान्ये), प्रसाद डोके (रामफळ), शंतनु डोके (चहा व वांगे), रुद्र डोके (कलिंगड), स्वराज व स्वरूप डोके (कोबी), ओवी डोके (शेवगा) माहिरा व इकरा व आलिम इनामदार ( हरभरा भाजी, टोमॅटो )आदी विद्यार्थ्यांनी विविध फळे-भाज्यांची विक्री केली.



या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नाणी-नोटा ओळखणे, खरेदी-विक्री, नफा-तोटा, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, वजन व मापन अशा गणितीय क्रिया प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बाजार व्यवहाराचे ज्ञान आणि गणिताविषयीची आवड वाढताना दिसून आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम लोलापोड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन यशवंत घोडे सर यांनी केले. या उपक्रमात कुमशेत शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शैक्षणिक उपक्रमातून गणित शिकवण्याचा हा अभिनव प्रयत्न असल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments