Type Here to Get Search Results !

रोटरी आणि जीडीबी इंटरनॅशनल यांच्यावतीने अधिकाधिक शाळांना रंग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न-मिलिंद घोडेकर.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर 

रोटरी ब्राईट स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत भाऊसाहेब बोरा आणि माळशेज विद्यालय मड या विद्यालयास रंग कामासाठी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी तर्फे रंग उपलब्ध करून देण्यात आला होता. विद्यालयाच्या इमारतीचे रंगकाम सुंदर पद्धतीने पूर्ण झाली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे मान्यवर आणि श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि संस्थेचे मान्यवर तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

या प्रोजेक्ट अंतर्गत जीडीपी इंटरनॅशनल या कंपनीच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांच्या सहकार्याने विद्यालयास तेराशे पन्नास लिटर रंग उपलब्ध करून देण्यात आला होता. उच्च दर्जाच्या या रंगामुळे विद्यालयाचे रूपच पालटले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योजक श्री कुंडलिक सदाकाळ यांनी केले आहे. 

या प्रोजेक्ट अंतर्गत 150 पेक्षाही जास्त शाळांना आजपर्यंत रंग पुरवण्यात आलेला असल्याची माहिती जीडीबी इंटरनॅशनल चे समन्वयक अतुल कुलकर्णी यांनी दिली. 

तालुक्यातील अनेक शाळांसाठी अजूनही रंग उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे माहिती रोटरी झोन 2 चे सहाय्यक उपप्रांतपाल श्री धनंजय राजुरकर यांनी याप्रसंगी सांगितले.

विद्यालयासाठी अजूनही आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष मिलिंद घोडेकर आणि सचिव प्रशांत खत्री यांनी व्यक्त केले. तसेच याप्रसंगी रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीचे ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष श्री दत्तात्रय म्हस्के भाऊसाहेब बोरा आणे माळशेज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मढ या.जुन्नर जी पुणे शाळा रंगकाम व युनिट प्रधान सोहळ्यासाठी संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक श्री गोडे एल बी.,श्री मोढवे एस व्ही, श्री आहेर एस जी, श्री सदाकाळ के बी. ,श्री नायकोडी एन डी.हे देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments