प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरे खुर्द येथे मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता क्लीन एनर्जी एक्सेस प्रोग्रॅम अंतर्गत ऍपटीव्ह कंपोनेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आय. आय. ई. सी. यांच्या वतीने " सोलर प्लांट लोकार्पण सोहळा " चे उदघाटन आपप्टिव्ह कंपनी चे अधिकारी संकेत जाधव, सागर वाव्हळ व आय. आय. ई. सी. चे सिनियर अधिकारी अमर यादव, सिनियर प्रोग्राम मनेजर अनंत जोशी, अधिकारी जायनवाट मनीष सेहरावत, समन्वयक तुषार बिनवडे, अंकुश कोकणे मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी आय आय ई सी चे प्रमुख अधिकारी अमर नाथ यादव होते. जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द, पाडळी, चिंचोली मराठी, घाटघर, सितेवाडी, करंजाळे या शाळांना सोलर प्लांट प्देण्यात आले.
विजेची सोय व्हावी म्हणून हा प्रकल्प भविष्यात इतर शाळांना उपयुक्त ठरेल. त्यामुळे संगणक कक्ष असेल इतर विजेच्या संबंधित सोयीसुविधा असतील तर निश्चित त्यासाठी सोलर चा फायदा होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कंपनीच्या सर्व अधिकारी यांचा सन्मान चिन्ह, शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थी त ग्रामस्था व मान्यवरांचा सर्व शाळांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच राज्य गुणवत्ता यादीत आलेले वेदांत विशाल येंधे व ओम संतोष शिर्के व मार्गदर्शक शिक्षक निलेश सरोदे सर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती जुन्नर चे गटविकास अधिकारी प्रतीक चान्नावार, सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, केंद्रप्रमुख रविंद्र कुटे, जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे, चिंचोली शाळेचे मुख्याध्यापक युवराज मोहरे, पाडळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील हाडवळे, सितेवाडी शाळेचे मुख्याध्यापक होना गवारी, पंढरीनाथ लांडे, करंजाळे शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव मांडवे, लक्ष्मण यंदे, घाटघर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, प्रशांत लोखंडे उपस्थित होते
तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर वायकर, उपाध्यक्ष दिपाली जाधव, सरपंच मनीष बर्डे, उपसरपंच लक्ष्मण वायकर, चिंचोली चे सरपंच काशीद, दत्तूशेठ वायकर, अशोक वायकर, प्रकाश वायकर, रामदास येंधे कृष्णा लोखंडे, केरभाऊ शिर्के, रोहिदास जाधव, मयूर वायकर, ग्रामसेवक विलास वायकर भाऊसाहेब, निलेश औटी, अर्चना औटी, शितल वाकचौरे, वर्षा बर्डे, हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र भोर, यशराज वायकर, पालक, ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विकास मटाले, गुणवंतराव इंगळे, सुरेखा म्हके, वर्षा बर्डे यांनी केले. प्रास्ताविक हिवरे खुर्द शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले. सुत्रसंचालन निलेश सरोदे यांनी केले व उपस्थित मानवाराचे आभार सुनील हाडवळे मानले.



Post a Comment
0 Comments