Type Here to Get Search Results !

देशातील "या" राज्यात आहे सोंड नसलेला एकमेव गणपती, वाचा सविस्तर!

 


जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.

गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

मात्र,दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे,मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. 

आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते.

Post a Comment

0 Comments