Type Here to Get Search Results !

प्रवाशांचा जीव मुठीत धरून एसटीने प्रवास, नारायणगाव आगाराच्या बस खिळखिळ्या.....

 


जुन्नर – महाराष्ट्रातील जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून या तालुक्यात लेण्याद्री, ओझर, नाणेघाट, दाऱ्याघाट, चावंड किल्ला, हडसर किल्ला, व विविध बौध्दकालीन लेण्या आहेत, हे पर्यटन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून पर्यटक मोठ्या संख्येने तालुक्यात येत असतात, मात्र प्रवास करत असताना तालुक्यातील एकमेव नारायणगाव आगाराच्या लालपरीने हा प्रवास सर्वसामान्यांना करावा लागतो, मात्र हा प्रवास करत असताना आता मात्र प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे, कारण, बहुतांश एसटी बसच्या खिडक्या निकामी झाल्या आहेत, काचा तुटल्या आहेत, पत्र्यांची अवस्था वाईट असून ड्रायवरला देखील बस चालवताना जीवावर उदार होऊन बस चालवाव्या लागत आहेत, कारण बस सुरू असताना या बस अक्षरश हेलकावे खात असतात व संपूर्ण साठा पुढे मागे होत असतो, यामुळे कदाचित अपघात देखील घडू शकतो मात्र या गोष्टीकडे नारायणगाव आगाराच्या प्रशासनाने वेळीच या गोष्टीची दखल घ्यावी, जेणेकरून प्रवाशांना चांगला प्रवास करता येईल, ग्रामीण भागातील पश्चिम पट्ट्यातील हि दयनीय अवस्था असून प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन वेळीच चांगल्या बसेस या भागात पाठवाव्यात जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी व नागरीक करत आहेत.



Post a Comment

0 Comments