Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार सदर -शापित



राधानगरी हे फार पूर्वीचे वसलेले शहर. दिसायला परिसर खूप मोठा असला तरी येथे लोकसंख्या मात्र विरळच. धार्मिक दृष्ट्या ही जागा अपशकुन मानली जाई. काळया जादूची नगरी म्हणून ही प्रचलित होती. कारण ह्या शहरात जो व्यक्ती जाईल , तो पुन्हा कधीच कुणाला दिसत नसे. 

  काय असेल नेमके यामागील रहस्य?

  व्यक्ती गायब कशी होत असेल ?

  की खरच त्यांचा मृत्यू होत असेल?


एके दिवशी सोहम आणि राहुल हे सहज सुट्ट्यांसाठी मौजमस्ती म्हणून फिरता फिरता राधानगरी मध्ये आले. त्यांना या शहराच्या रहस्याबद्दल काहीच माहीत नव्हते. कारण ते वयाने तसे बारिकच.पण बुद्धी मात्र चंचल आणि चपळ.शहराच्या बाहेर सगळीकडे वार्ता पसरली की सोहम आणि राजू नेमके गेले कुठे? कुणी बोलू लागले की हरवले असतील. तर कुणी बोलू लागले की ते जीवित ही नसतील. अशा अफवा सर्वत्र पसरू लागल्या.राहुल अंक सोहमच्या घराजवळ राहणाऱ्या सचिनने आईवडिलांना सांगितले की ते फिरायला म्हणून राधानगरीमध्ये गेले. अन् आता मात्र जोरदार चर्चा रंगली की आता यांचं काय होणार? हे दोघे आता वाचणार नाही हा सगळ्यांचा समज झाला. बिचारे आईवडील मात्र काळजीपोटी तळमळत होते. राहुल अन् सोहम त्यांचे एकुलते एक जुळे अपत्य गेल्यापासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक मात्र कण गेला नव्हता.  सोहम आणि राहुल मात्र मात्र मजेत राजवाड्यात राहत होते. त्यांना कसलीच कल्पना नव्हती. घरी फोन करायला घेणार तितक्यात फोनची बॅटरी स्विच ऑफ झाली . ते निघताना आनंदाच्या ओघात घरी सांगायचं विसरून गेले होते. रात्र सरत आली होती. अंधार पडू लागला. राहुल आणि सोहमच्या पोटात कावळे ओरडू लागले. ती एक भयाण रात्र अमावस्येचा काळोख होता. राहुल अन् सोहम मात्र अंधश्रद्धा सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हते. पण या बद्दल जाणून घेण्याचे तसे त्यांना कुतूहलच होते. राधानगरी मध्ये जे जे रहस्य जाणून घेण्यासाठी आले होते , ते पुन्हा परत आले नाही. राहुल आणि सोहमला भूक अनावर झाली. कुठे काही दुकान आहे का यासाठी ते बाहेर निघाले. गाडी बाहेर काढली.हॉटेलमध्ये दोघांनी जेवण केले.  गाडीचे पेट्रोल खूप कमी होते. पण त्यांनी आधीच जास्त पेट्रोल टाकले होते तरी ते संपले कसे? काही कळेना. राहुल पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेला.  अन् सोहम हॉटेलच्या बाहेरच उभा बाल्कनीत फेरफटका मारत राहुलची वाट पाहत होता.  राहुलला इकडे दूरदूर कुठेच पेट्रोल दिसेना. त्याने गाडी अखेर बाजूला उभी केली. आणि पाईपाई जाऊ लागला. एक मनुष्य त्याला रस्त्यात भेटला. दिसायला जाडजूड भरभक्कम होता. दिसण्यावरून तो अगदी श्रीमंत घराण्यातला गुंड सारखा वाटतं होता. त्याने पेट्रोलपंप कुठे आहे तो दाखवला . राहुल विचारात पडला “ अरे ! न काही सांगता याला कस समजल मला काय हवं आहे.” राहुलला अखेर पेट्रोलपंप सापडला. तो पर्यंत अक्षरशः अंधार खूप गडद होता. आणि तो पेट्रोलपंप जरा अडगळीतच होता. अन् तिथे एकच पिवळ्या रंगाचा दिवा चालू होता. राहुलला तिथे अजून एक विचित्र माणूस दिसला . त्याचा चेहरा विचित्र दिसत होता. केस विंचरलेले नव्हते. केस दाढी ही खूप वाढलेली होती. खुन्नस नजरेने तो राहुलकडे पाहत होता. त्याला पाहून राहुल जरा मात्र घाबरून गेला. तो निघणार त्याचवेळी एक काळी मांजर रस्ता ओलांडून गेली. सुमारे  मध्यरात्री 12 1 चा प्रहर होता. रस्त्यावर एक कुत्रा देखील नाही. राहुल गाडीपाशी आला. त्याने गाडी काढली आणि प्रवासाला लागला.घाटाचा मार्ग लागला होता. सुन्न रस्ता होता. काजव्यांचा गुंजारव मानला भीती घालत होतो. उगाच आपण इथे आलो असे राहुलला वाटले. राहुलच्या मनात असंख्य वाईट विचार येत होते. त्याच्या सोबत जर सोहम असता तर .. त्याला पुरते बरे वाटले असते. 

इकडे सोहम एकटाच होता. तो मात्र असल्या दैवशक्ती , भुतप्रेत या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. राहुल थकून राजवाड्यात गेला होता. तशीच त्याला गाढ झोप लागली होती.अचानक त्याला राहुलला कुणीतरी ठार मारताना दिसले आणि ह्या स्वप्नाने त्याला खडबडून जाग आली. राहुल अजून आला का नाही. हे पाहण्यासाठी सोहम ने लाईट चालू करावी म्हणून बटन दाबले. तर लाईट कमी जास्त होत होती. अन् बाहेर प्रचंड हवा असल्याने खिडक्या ही जोरात वाजत होत्या. सोहम खिडक्या बंद करायच्या विसरल्याने त्याने कशातरी खिडक्या बंद करायचा प्रयत्न केला. पण हवेचा जोर अधिक असल्याने त्या बंद झाल्या नाही. नंतर त्याला आरशासमोर जे काही दृश्य दिसले ते खूप थरारक होते. आरशासमोर त्याने जाऊन पाहिलं तर कुणीतरी रक्ताने लिहिलेली मोठी मोठी अक्षरे पुसट दिसत होती “ की आता तुझा भाऊ मरणार…” 


सोहम लगेच पायपायी अनवाणी तसाच धावत राहुलच्या शोधात निघाला. त्याला राहुलला तर वाचवायचेच होते पण या राधानगरीच्या रहस्याचा उलगडा करायचा होता. मध्येच राहुलला काळी मांजर आडवी गेली. पण तरीही त्याने माघार घेतली नाही. इकडे सोहमला राहुलची गाडी वाटेत एकटीच उभी दिसली.अपघात झाला असावा तर गाडी सुस्थितीत होती.  सोहम गेला कुठे ? राहुल त्याच्या शोधात फिरतच राहिला. तो पूर्णतः घाबरून गेला होता की खरच सोहमला काही झाले नसेल ना? सोहमला इकडे अंधाऱ्या खोलीत कुणीतरी बंदिस्त केले होते. त्याने जीवाचे रान करून तिथून पळ काढला. तितक्यात त्याला समोर एक लहान मुलगा दिसला. आणि मागून दबक्या पावलांचा आवाज येत होता. राहुलने त्या मुलाला वाचवण्यासाठी दोघे एका ड्रम मागे लपले. त्यांच्याकडे चार व्यक्ती येत होत्या. आणि त्यातील दोन व्यक्ती राहुलने पेट्रोल पंपावर पहिल्या होत्या. आणि त्यातील एक व्यक्ती राहुलला पेट्रोल पंपाचा रस्ता सांगणारी होती. ते व्यक्ती तसेच निघून गेले. तो लहान मुलगा बिचारा त्याच्या पायावर टीचरे पडले होते. त्याचे कपडे फाटले होते. तिथेच सोहमला 

त्याने दादा म्हणून हाक मारली “ दादा प्लीज आम्हाला वाचव !” अन् समोर एका खोलीकडे बोट केले. खोलीला बाहेरून कुलूप असल्याने सोहमने दरवाजा तोडला. तशी त्याला बाकीची वेगवेगळी लहान मुले म्हातारी माणसे , आणि महिला दिसल्या. त्यांची अवस्था पाहण्यासारखी ही नव्हती. खूप वर्षांपासून तेथे त्यांना कैद केले होते. पोलिसांना सांगावे इतपत अजून येथे सुविधा नव्हत्या. सोहमने त्यांना सगळ्यांना बाहेर काढले. आणि पहाटेच्या सुमारास जवळजवळ आसपास कुणीच नसताना ही सोहमने धाडस दाखवून सगळ्यांची सुटका केली. आणि जे गुंड होते त्यांना घरासकट जाळून टाकले. कारण अंधविश्वास यांच्या जोरावर हा सगळा प्रकार चालू होता. आणि वर्षानुवर्षे येथे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण यांनी पसरवले होते. लोकांना कैद करून त्यांना मारहाण केली जात होती. या सर्व संकटातून राधानगरीची त्यांनी मुक्तता केली. राहुलला हा प्रकार नंतर समजला त्याला देखील आनंद झाला. संपूर्ण शहराबाहेर देखील सोहमच्या धाडसाचे कौतुक झाले. सर्वत्र त्याची चर्चा रंगली. आईवडील देखील खुश होते. सोहम आणि राहुलला पाहून त्यांना आनंद झाला. राधानगरी जी शापित म्हणून ओळखली जात होती. आज त्याच ठिकाणी सर्वजण आनंदाने राहू लागले. अंधविश्वास हा प्रकार राधानगरीत तरी मिटला होता. 


संदेश: अंधविश्वास देवदेवता , भूत या गोष्टीचा अतिरेक झाल्यास समाजातील व्यक्ती याचा फायदा घेतात. याची आपल्याला कल्पना देखील नसते. अन् मुळातच अंधविश्वास मानून आपण स्वतःचेच नुकसान करून घेतो. आजदेखील आपण २१ व्या शतकात तंत्रज्ञान विज्ञान युगात राहून देखील सर्वत्र अंधश्रध्देचा पगडा कायम आहे. यामुळे अनेकांचे बळी देखील जात आहे.

Post a Comment

0 Comments