चारोळ्या
जगायचंय म्हणून
कसंही कां जगायचं ?
आपण तर माणूस
माणूस कां न व्हायचं ?
माणूस म्हणावं तर
माणसासारखं नाही
हैवान म्हणावं तर
हैवानासारखं नाही
जन्म माणसाचा पण -
माणूस कां न वाटेना ?
माणूस कमी , गाढव -
असं कां वाटावे म्हणा ?
मागून मिळत नाही
जन्म पुन्हा माणसाचा
लक्ष लक्ष योनीतून -
जन्म होतो माणसाचा
माणूस म्हणून जगी
आपली काय ओळख ?
ओळख कमी, परंतू -
नालायकच अधिक
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो . नं . 07620540722

Post a Comment
0 Comments