Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत. आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


मरणाच्या दारीपण -

जीण्याचा शोधतो अर्थ

मरण येवो खुशाल

पाहणार नाही स्वार्थ


रडता रडतापण -

हसता यावे खुशाल 

विझता विझतापण -

जगता यावे निर्मळ


हसूनही मी पाहिलो

रडूनही मी पाहिलो

माझे मी जगण्यातच -

स्वतःला धन्य मानलो


कधी मोगरा छळतो

कधी केवडा जाळतो

चाफा सांग तूच जरा -

तुला कोण आवडतो ?


फूल असो कुठलंही

स्पर्धाच करत नाही 

आपला गंध पेरत

सदा दरवळू पाही

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं . 07620540722

Post a Comment

0 Comments