Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार लेख - माणुसकीचा झरा गणेश चौधरी गुरुजी - लेखक - प्रशांत दामले



दर्यापूर तालुक्यात पिंपडोद या गावचे रहिवासी गणेश चौधरी गुरुजी हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपलोड येथे कार्यरत होते गेल्या 25 वर्षापासून त्यांनी आपले आयुष्य विद्यार्थ्या साठी समर्पित केले. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने अनेकांच्या मनावर त्यांनी मायेचा ठसा उमटवलाय आय टीआय प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना प्रेम भावनेने आपला जीव ओतून शिक्षण दिले जेणेकरून आपल्या हातातून गेलेला विद्यार्थी आयुष्यात यशस्वी झाला .पाहिजे गुरुजींनी पाहिलेले स्वप्न मात्र खरे झाले, गेल्या 25 वर्षापासून  विद्यार्थी प्रशिक्षण सोबत गुरुजींनी दिलेली शिकवण भाषेत गोडवा, आपुलकी, दया प्रेम, सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाची माणुसकी प्रेमाने जग जिंकता येते. हे ऐकले होते पण गुरुजींना भेटल्यावर हे मात्र तितकेच खरे आहे. असे शिक्षण सोबत टेक्निकल घेऊन शेकडो विद्यार्थी नोकरीला लागले काहींनी नामावंत फॅब्रिकेशन वेल्डिंग शॉप मोठमोठे कारखाने उभारले ज्यातून इतर लोक कामातून रोजी रोटी कमवून रोजगार निर्मित केले हे खूप अभिमानाची बाब आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असताना त्यांचा मोबदला त्यांना मिळत होता पण पैसा हा ऊन सावलीचा खेळ आहे असे त्यांचे मत होते. सुखदुःखाची परवा न करता विद्यार्थ्यांना त्यांनी विद्यार्थी म्हणून नव्हे तर एका मित्रासारखं वागून संकटातून मार्ग कसा काढावा जीवन कसे जगावे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. येथून गेल्यावर हे कोणीच शिकवणार नाही प्रत्येकाच्या जीवनाला त्यांनी आकार देत तयार करून विद्यार्थ्यांच्या मनात अथोनात ज्ञानाचे प्रकाश टाकून मनाचे परिवर्तन करून पाठवले. गेल्या 25 वर्षापासून अनेक बॅच आल्या आणि निघून गेल्या . त्यांनी त्यांचा गुण सोडला नाही, मी जरी मोठ्या पदावर विराजमान झालो नाही किंवा सरकारी नोकरी देखील लागली नाही. पण आपण विद्यार्थ्यांना चांगले ट्रेनिंग दिले तर येणाऱ्या काळातले माझे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून आपले आणि इतरांचे पोट भरतील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपले आयुष्य समाधान कारक जीवन जगले. पण त्यांनी कधीच कुण्या विद्यार्थ्यांशी भेदभाव केला नाही कारण त्यांना सर्व एकसमान होते. असे दयावंत शीलवंत मनाने श्रीमंत अष्टपैलू व्यक्तिमत्व कधीही न बदलणारा स्वभाव म्हणजेच" देव माणूस" चौधरी गुरुजी त्यांचे कितीही कौतुक केले तितकेच कमी आहे आणि लिहायला बसलो तर शब्द कमी पडतील आपल्या या भारत देशात लोकांनी शिक्षक दिवस साजरा केला वेगवेगळ्या भाषा असल्या तरी त्यातील भावभावना महत्त्वाच्या ठरतात अनेकांचे भविष्य उज्वल करणारे चौधरी गुरुजी आपलेही जीवन आनंदमय हो दुःख तुमच्या कोसो दूर राहो आरोग्य संपदा ऐश्वर्या लाभो भगवंता चरणी प्रार्थना करून इथेच थांबतो आपला विद्यार्थी प्रशांत दामले.....!


    

         लेखक प्रशांत ना दामले

          पिंपळोद दर्यापूर 

           8605521369

Post a Comment

0 Comments