चारोळ्या
माणसाला परिस्थिती
खूप काही शिकविते
पारखून पुढे जाणे
आपल्या हाती असते
माणसातला माणूस
" माणूस " पाहिना झाला
माणसातल्या पशूला
लळा कां लावी कळेना ?
मेल्यावर माणसाची
चांगला म्हणून शेरा
जीवंत असता मात्र -
निंदा - नालस्तीचा फेरा
माणसा , आज तुझ्यात
इतका कसा बदल ?
माणूस म्हणूनपण -
ओळखू येईना झालं
माणूस आजचा स्वार्थी
आधी आपले पाहतो
इतरांच्या बाबतीत -
गैर कां वागू पाहतो ?
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो. नं . 07620540722

Post a Comment
0 Comments