Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार लेख - मन - लेखिका- सौ. शितल सतिश शिंदे



शरीर तर माहितीय पण हे मन नेमक आहे काय ?कुठे असत नेमक? हे शरिरासारख दाखवू ही शकतं नाही. मन सजीव की निर्जीव ?पण सजीवातच हे दडलेले असते. मन म्हणजे मनसोक्त जगणे. मनाला हवे तसे वागणे. पण नेहमी मनाला हवं तस करता येत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला मन आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला मन असत. त्यातले काहीजण आपल्या मनापेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतात. तर काही दुसऱ्यापेक्षा स्वतःचा फक्त विचार करतात. 

आजकाल एक वैचारिक दृष्ट्या सत्य परिस्थिती जर जाणली तर जबाबदाऱ्या , पैशांची गरज , हव्यास , श्रीमंती  यांच्याखाली ही मने कुठेतरी लोप पावत चालली आहे. माणूस दुसऱ्याच्या भावनांचा गरजेचा विचार तर करतच नाही. शिवाय स्वतःकडे ही स्वतःचे लक्ष नसते. मन मारून प्रेम , सामंजस्य , आपुलकी यांची जागा द्वेष , मत्सर , हेवा , गर्व यांनी घेतली. म्हणतात ना मनातले जे भाव असतात ते वरवर नसून अंतर्भाव असतात. मग त्यात हसू , आसू , राग , द्वेष सगळे नैसर्गिक असते. पण आजकालच्या आधुनिक तंत्रयुगाच्या काळात मने ही कृत्रिम तंत्राप्रमाणे झालीत. मनाचा रिमोट कंट्रोल जणू दुसऱ्याच्या हातात असतो. अन् एखाद्या कठपुतलीची दोरी दुसऱ्याच्या हातात असते. अन् त्याला हवं तसे तो चालवतो. तसेच माणसांची मने ही दुसऱ्याने केलेल्या स्तुती , निंदा यांवर अवलंबून असतो. मग ते बोलतील तेच त्यांच्यासाठी  खर. मग ते खोटं का असेना. 

बघा ना ! आज चित्रपट सृष्टीचच उदाहरण घ्या . एखादे पत्र भावनिक असेल रडण्याचा प्रसंग असेल तर हे भाव आपोआप तेथे यायला हवे. पण तिथे कृत्रिमता वापरून काहीतरी ड्रॉप डोळ्यात टाकून रडू आणल जात. बस स्टॉप वर जा की कुठे गर्दीत जा , कुणीच कुणाला समजू शकत नाही. त्यात एखाद्या व्यक्तीच्या मनात किती दुःख असेल याची कल्पना करणे म्हणजे अशक्यच. अन् शहराकडील विचार न केलेला बरा. एखाद्या आईच मुल गेल्यानंतर तिच्यावर काय शोककळा पसरली असेल. ते तिलाच मही असत. अन्याय होत असताना दिसत असून चिमुरड्यांचा जीव जातो अन् अन्याय करणारा देखील आपल्यातीलच एक असतो. तेव्हा कुठे असत हे भावनिक मन ? निष्ठुर मनाने जस आई काळजावर दगड ठेऊन जगत असते. तिच्या सांत्वनासाठी मात्र कुणीच नसत. जगण्याची उमेद मनाला नसली तर शरीर त्यागले जाते. सगळा आयुष्याचा खेळ शरीरावर चालत असला तरी तो चालवायचा की नाही किंवा कसा चालवायचा हे मनावर अवलंबून असत हे देखील तितकंच खर ..


लेखिका - सौ. शितल सतिश शिंदे 

Post a Comment

0 Comments