Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत- काव्य लेखन - दिवस रात्र - कवी - प्रा. आनंदा डावरे



 दिवस रात्र

आले दिवस गेले दिवस 

किती भराभरा उडून जातात हे दिवस-रात्र 

वृक्षराजीच्या पाचोळ्यासारखे 


बाल वयातले हे दिवस रात्र 

किती मुलायम नाजूक साजूक 

पाळण्यातल्या गोंडस बाळासारखे

त्याच्या गर्द गुलाबी तळव्यासारखे 

किती थांबू म्हटले तरी थांबले नाहीत मातीतल्या थेंबा सारखे विरून गेलेत 


यौवनातले हे दिवस रात्र 

किती रंगीबेरंगी बहुरंगी 

मध्यरात्रीच्या स्वप्नातल्या परी सारखे 

रानात वनात तळ्यात मळ्यात 

रुंजी घालत होते स्वप्नांचे भ्रमर 

झाडाझुडपात पानात फुलात 

सोनप पिवळ्या कोवळ्या उन्हात

ग्रीष्मातल्या बहरलेल्या मोहरा सारखे 

खूपच काही बहरून गेले 


किती थांबू म्हटले तरी थांबले नाहीत 

सांडल्या स्पिरीट सारखे संपून गेलेत 


प्राध्यापक आनंदा डावरे अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर 95 79 76 48 64

Post a Comment

0 Comments