छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथून सुटका या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे दरवर्षी पुणे ते शिवनेरी असे २०० किमी सायकल राईड चे आयोजन होते यावर्षी ३७५ सायकल स्वरांनी यामध्ये सहभाग घेतला. सदर वर्ष पुणे ते शिवनेरी या राईडचे चौथे वर्ष आहे , पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमन करते. एका दिवसामध्ये तब्बल १०० किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले. शनिवार २१ सप्टेंबर रोजी मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी सहा वाजता सदर सायकल राईड ला झेंडा दाखवून सुरुवात झाली यावेळी एमआयडीसी चे अधिकारी प्रकाश शेडबाले त्याचप्रमाणे आय ए एस चे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ उपस्थित होते.
आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून १७ ऑगस्ट १६६६ साली सुटले होते या घटनेला यावर्षी ३५७ वर्ष पूर्ण झाली ते आग्रा येथून निघून मथुरा, प्रयागराज, वाराणसी, गया, कटक, हैदराबाद, मलखेड, विजयपूर, गोकर्ण, पन्हाळा आणि राजगड किल्ला असे तेराशे किलोमीटर अंतर तेरा दिवसांमध्ये पार करुन राजगडावर ३० ऑगस्ट रोजी पोचले होते याच महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आम्ही दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित करतो असे आय ए एस चे संस्थापक सदस्य आणि इतिहास अभ्यासक गणेशजी भुजबळ यांच्यातर्फे सांगण्यात आले. इतिहास तज्ञ व जुन्नर येथील उद्योजक यश मस्करे यांनी देखील जुन्नर तालुक्यामध्ये सर्वांचे स्वागत केले.
पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग - नाशिक फाटा - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - शिवनेरी. असा होता .अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व साईकलिस्ट ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न झाला. असे आय ए एस शिवनेरी सायकल राईड चे प्रमुख रमेश माने व मदन शिंदे यांच्या तर्फे सांगण्यात आले.
नियोजनामध्ये गिरीराज उमरीकर, सुशील जी मोरे, दादासाहेब नखाते, प्रतीक पवार, श्रेयस पाटील ,अजित गोरे, प्रणय कडू , एडवोकेट पंजाबराव इंगळे, मुकुंद दांगट पाटील, हनुमंतराव शिंदे, कैलास शेट तापकीर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीराज हॉटेल तर्फे सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आले.



Post a Comment
0 Comments