Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत. आजच्या चारोळ्या



  चारोळ्या 

आज मी देव पाहिलो

देवाचे रूप पाहिलो

आज मरणांती मात्र -

देवाचेच रूप झालो


आपली सगळी कर्मे -

देव पाहतोच आहे

जसे कर्म तशी शिक्षा 

देव त्यासि देतो आहे


आज नाही तर उद्या -

पैसा कमावता येतो

गेलेला विश्वास मात्र -

परत येत नसतो


सारं काही ठीक होतं

अचानक झालं कसं ?

आज पुढे जाणा-यांचे -

थांबलेत कसे पाय ?


माणुसकी माणसाला-

माणूस बनू पाहतो

मग माणूस माणसा -

पशू कां बनवू पाहतो ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

 मो.नं.07620540722

Post a Comment

0 Comments