Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत आजच्या चारोळ्या

 


 चारोळ्या 

जिंदगी तशी सा-यांची

जिवंत जगतो कोण?

सगळेच मेल्यागत -

जगताहेत जीवन 


कुणाला मारून खाणे

आपली नीच विकृती

कुणाला जीवन देणे

आपली उच्च प्रवृत्ती


सा-यांचं सारंच ठीक

पण चुकतोय कोण ?

मला मात्र कळेचना -

इथे बरोबर कोण ?


स्वातंत्र्य मिळालं पण -

त्याचा उपयोग काय ?

खाणारा खातो , उपाशी -

मरतोय त्याचं काय ?


" भारत माताकी जय "

असं गर्वाने म्हणतो

मातेवर सांगा, कोण -

कितीसे प्रेम करतो ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून ) 

मो.नं .07620540722

Post a Comment

0 Comments