वियदगंगेचा सुगावा
तिच्या पदरात कायमचा विसावा शोधला असता
मला सोडून जाण्याचा सुगावा लागला असता
मनाच्या बंद खिडक्या मी जराशा खोलल्या नसत्या
तिच्या वाचून जगण्याचा दुरावा भोगला असता
हुशारी कागदावरती दिसायाला हवी होती
मला बदनाम केल्याचा पुरावा जाळला असता
जरासे तथ्य तंत्राचे तुला जर माहिती असते
असा चौकात येण्याचा दिखावा टाळला असता
तुझा तर देह जास्वंदी कशाला मोह चाफ्याचा
तुझ्या दारात सोनेरी बहावा लावला असता
खर्याची साक्ष मित्रा तू भरायाला हवी होती
तुझ्या पायात चमडीचा खडावा घातला असता
कुणा धोक्यात ठेवावे कधी जर वाटले असते
मुखाला सप्तरंगांचा गिलावा फासला असता
सिराज शिकलगार
9890597855

Post a Comment
0 Comments