Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत



चारोळ्या 

प्रत्येक फुलांचा जसा

गंध नि वास वेगळा

प्रत्येक माणसांचाही -

तसा स्वभाव वेगळा


दिवस जाते कामात

रात्र पूर्ण विचारात

मन मरताना मात्र -

शरीर जातं खंगत


दृष्टीकोन बदलता -

जीवनही बदलतं

हवं तसं जगायला

जगणं सोपं करतं


आपलं चालत नाही

तिथं कशाला थांबावं ?

आपलं चालतं तिथं

जीव आपलं ओतावं


कुठंतरी कधीतरी

काहीतरी होत जातं

परंतु काय होतंय-

कधी कळत नसतं

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

0मो.नं.07620540722

Post a Comment

0 Comments