Type Here to Get Search Results !

मंचरला कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात!

 


आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्रा अनिल निघोट.

मंचर दि.२२ सप्टेंबर -  मंचर च्या महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेज घ्या विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त विद्यार्थी शिक्षकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात दोन किलोमीटर लांबीची अभिवादन यात्रा काढली.

यात ढोलपथक, लेझीम पथक, पारंपरिक लोकनृत्य, समाज भूषण व्यक्तीमत्वांची व पारंपरिक भारतीय, महाराष्ट्रीय वेशभूषा केली होती, अण्णासाहेब आवटे कॉलेज चे एन एस एस ,एन सी सी पथक व विद्यार्थी प्राध्यापक सहभागी झाले होते,ज्याला पालक, ऊपस्थित ग्रामस्थांनी सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला, महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी व विज्ञान प्रदर्शनात विविध नाविन्यपूर्ण बाबींचे सादरीकरण केले.यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य आवारी, अण्णासाहेब आवटे कॉलेज चे प्राचार्य डॉ नानासाहेब गायकवाड सर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापक चित्रा बांगर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक  संजय दवंडे सर, चासकर सर तसेच सर्व विद्यार्थी,शिक्षकांनी सहभागी होत या शिक्षणमहर्षी सर अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments