आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले यांचे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी व आदिवासी समाजासाठी विशेष योगदान आहे.त्यांनी दिलेले आदिवासी प्रश्नांवरचे लढे हे सतत प्रेरणा देणारे ठरावे यासाठी त्यांच्या नावाने मागील तीन वर्षापासून, स्मृती पुरस्कार,अखिल भारतीय किसान सभा,आंबेगाव तालुका समितीच्या वतीने नियमित दिला जात आहे. हे या पुरस्काराचे चौथे वर्षे होते.
यावर्षाचा आदिवासी सेवक,शंकरराव विठू केंगले,स्मृती पुरस्कार हा माजी पंचायत समिती उपसभापती निसर्गवासी तुकाराम भोकटे यांना देण्यात आला.निसर्गवासी तुकाराम भोकटे यांच्यावतीने त्यांच्या पत्नी व त्यांचा मुलगा रामदास भोकटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला व सामाजिक कार्यकर्त्या एड.शारदा वाडेकर यांनी स्वतः उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने,शेतकरी नेते व किसानसभेचे केंद्रीय सहसचिव कॉ.डॉ.अजित नवले यांनी जनतेची चळवळ कशासाठी व कोणासाठी ? या विषयावर सविस्तर व प्रेरक मांडणी केली.
तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.प्रमिला बांबळे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री.मारुती रढे यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानत अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप केला.
यावेळी किसान सभेचे पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी,विविध गावचे सरपंच आणि शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
या कार्यक्रमाचे संयोजन किसान सभा आंबेगाव तालुका समितीने केले होते.



Post a Comment
0 Comments