प्रतिनिधी जुन्नर : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना, समन्वय समितीची मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी जुन्नर येथे सर्व जुन्नर तालुका जिल्हा संघटना पदाधिकारी व तालुका संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. या सभेत राज्य कार्यकारीणी व जिल्हा कार्यकारीणी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या आदेशान्वये पुढील विषयांवर चर्चा व ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला असे.
संचमान्यता शासननिर्णय दि. १५/०३/२०२४ व कंत्राटी शिक्षक भरती शासननिर्णय दि. ०५/०९/२०२४ या अन्यायकारक शासननिर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आपण सर्वांनी तालुक्यातील चळवळीत अग्रणी राहून पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
🔹 बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी शाळेत काळी फित लावून सदर या निर्णयाचा आजपासून निषेध करणे.
🔹 दि. १८/०९/२०२४ पासून सर्वांनी प्रशासनिक व्हाट्सअप ग्रुपमधून ठिक ११ वाजता एकाचवेळी केंद्र, बीट व तालुका आणि जिल्हा ग्रुपमधून बाहेर पडणे
🔹दि.२५/०९/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात येणाऱ्या महामोर्चात सामुहिक किरकोळ रजा घेऊन सहभागी होणे
वरील बाबी नियोजनबद्ध होणेसाठी आपण *तालुक्यातील सर्व संघटनांशी समन्वय साधून एकत्रित उदया बुधवार दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी सांयकाळी ठिक ५ वाजता मा.गटविकास अधिकारी व मा.गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन निवेदन देण्यात येणार. सर्व तालुका संघ पदाधिकारी यांनी शिक्षकांमध्ये जागृती करावी. असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सभेसाठी वरिल पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.सर्व जुन्नर तालुक्यातील शिक्षक बंधू- भगिनींना २५सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत तालुका समन्वय समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
आपले नम्र
जुन्नर तालुका समन्वय समिती

Post a Comment
0 Comments