Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत.



 चारोळ्या 

अशी कशी ही दुनिया

कशी ही दुनियादारी ?

माणूसच माणसाला

कां आणू पाही बाजारी ?


कुणाला मी काय सांगू ?

कुणाशी मी काय बोलू ?

जगतात तसे सारे

परतू येईना कळू 


मोठ्याची बातच और

त्यांची मातीपण सोनं

लहानांची मात्र इथे

सोनंही मातीसमान


काय द्यावे, काय घ्यावे-

काही कळेनासे झाले

जगा काही देऊनही

न दिल्याचेच वाटले


होत जातं कधीकधी -

नकळत काहीतरी

पण कां होईना  कधी -

मनाजोगे कधीतरी ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं .07620540722

Post a Comment

0 Comments