Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकाराला ठार मारण्याची धमकी, भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेकडून निषेध-जशास तसें उत्तर देण्यास भाग पाडू नका -अध्यक्ष विश्वास मोहिते

 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार श्री सुशील चौगुले यांना भर रस्त्यामध्ये अडवून अज्ञात व्यक्तीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली असून ही घटना लोकशाहीला काळिमा असून या घटनेचा भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या वतीने जाहिर निषेध करून दहशत माजवून, धमक्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज कंटकांना जशास तसें उत्तर द्यायला भाग पाडू नका असा इशारा भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी यावेळी बैठकीच्या माध्यमातून दिला आहे.

सविस्तर माहिती अशी, की मुक्त पत्रकार न्यूजचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी, आणि माहिती अधिकार महासंघाचे तालुका संघटक, श्री सुशील चौगुले यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार, सावंतवाडीतील एक ग्रामपंचायत माजगाव संदर्भात, अर्ज दाखल केला होता.या अर्जामुळे, ग्रामपंचायत व सावंतवाडी पंचायत समितीदेखील, अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले असून, हा अर्ज दाखल केल्यामुळे, अज्ञात व्यक्तींकडून श्री सुशील चौगुले यांना, पाच दिवसांपूर्वी ठार मारण्याची धमकी, भर रस्त्यात अडवून देण्यात आली आहे.या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोलापूर येथे बैठक घेण्यात आली यावेळी विश्वास मोहिते अध्यक्षस्थानी होते.

यावेळी उपाध्यक्ष दिपक मोहिते, बाबासाहेब कांबळे, कुलजीत महाजन, उत्तम मोहिते सह पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments