Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार फिरस्तीच्या वाटेवर सदर - महावटवृक्ष पेमगिरीच्या दिशेने....

 


मागील मे महिन्यात बाबाजिच्या सासरवाडीला जाण्याचा योग आला, योग म्हणण्यापेक्षा बाबाजीने फोन करून सांगितलं की, मेव्हण्याचं लग्न आहे आणि दोन तीन दिवस मला पण सुट्टी आहे तर सोन्या आणि तु ये लग्नाला...मी तेव्हा मुंबईत होतो बाबाजी म्हटला मी शनिवारी येतो तुम्ही पण या मी मग गुरूवारी मुंबईतून बोतार्डेला आलो शनिवारी जायचं का असा विचार करता करता वैभवचा फोन आला म्हटला भाऊ आपण उद्या जाऊ भाऊच्या सासरवाडीला मी म्हटलो चालेल...मग बाबाजीला त्याने फोन लावला तर बाबाजी चाकणच्या आसपास येत होता त्याच्यासोबत बोलणं झालं आणि वैभव म्हटला भाऊ आपण उद्या जाऊ आज आराम करतो मी कारण दमलो आहे म्हसा यात्रेवरून आल्यामुळे मग बाबाजीला तेच सांगितलं बाबाजी म्हटला या उद्या...वैभव आणि आम्ही रविवारी सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान बोतार्डे येथून निघालो वैभव त्या सकाळी माझ्याकडे घरी आला खाली ओढ्याच्या रस्त्यावरून मी आम्ही निघालो त्याचा पप्पा पण खाली रस्त्यावर उभा होता, त्यांना पण जायचं होतं...जुन्नरला त्याच्या पप्पाला सोडलं आणि आम्ही नारायणची दिशा धरली, मध्यात पेट्रोलपंपावर त्याने गाडीत पेट्रोल टाकलं आणि आम्ही भरधाव निघालो थंडी जबरदस्त होती, आम्ही स्वेटर कानटोप्या बांधून फिट होतो तरी गुलाबी थंडी जाणवत होती, वैभवच्या कानात ब्लुट्युथ असल्याने तो मजेत हलत डुलत चालला होता, मी गप्पा मारत होतो, नारायणगावच्या पुढील बाजूने आम्ही मधला मार्ग धरला आणि थेट आळेफाट्याच्या पुढे निघालो सकाळी आम्ही दोघं चहा पिऊन निघालो होतो, आळेफाटा चंदनापुरी घाट असं करत करत आम्ही चंदनापुरीच्या मागे असताना बाबाजीला नऊ ते साडे नऊच्या दरम्यान फोन केला तर बाबाजी म्हटला डायरेक्ट घरी या लग्नाला दुसऱ्या गावी जायचं होतं तिथून आपण तिघेपण सोबत जाऊ मग आम्ही डायरेक्ट त्याच्या सासरवाडीला म्हणजेच कौठे धांदरफळला गेलो वैभवला रस्ता माहित होता दोन ते अडिच तासांत आम्ही बाबाजीच्या घरी पोहोचलो बाबाजीच्या सासरवाडीत गेल्याबरोबर बाबाजीचे सासरे, मेव्हणे ताई आई यांनी आम्हाला जयभिम घातला, त्याच्या बारक्याला आम्हाला खायला नेता आलं नाही, कारण आम्ही रस्ता काटण्याच्या नादात लक्षात राहिलं नाही, तिथं गेल्यानंतर त्याची छोटी लहाण मुलगी ताई घेऊन बसली होती, बाबाजीचं आमचं बोलणं होत असतानाच बाबाजीचे सासरे दादा अतिशय रॉयल माणूस हसून खेळून पहिल्यांदा आयुष्यात असा माणूस पाहिला मी.... गेल्याबरोबर संपूर्ण शेती फिरवून दाखवली आणि माहिती दिली वाह...क्या बात है...आदर सन्मान पाहुण्यांबरोबर बोलणं वैगेरे झालं आणि आम्हाला पोहे चहा दिला आम्ही सर्वांनी पोहे चहा घेऊन बरोबर ११ वाजता घर सोडलं...कनोली गावाच्या दिशेनं आम्ही निघालो एका व्यक्तीला विचारून तो व्यक्ती म्हटला तुम्ही जाखोरी मार्गे जावा बाकीचे सर्व जण दुसऱ्या मार्गाने निघाले आम्ही दुसऱ्या मार्गाने गेलो थोडासा लांबचा प्रवास होता कनोलीत गेल्यावर लग्नाला तोबा गर्दी पाहिली अशी गर्दी आपल्या इकडच्या लग्नाला क्वचितच पहायला मिळेल हे सर्वसामान्य कुटुंबातील लग्न होतं तरी हजारोच्या आसपास पब्लिक होतं जेवण्ं ही अतिशय चांगलं झालं फक्त पाणी जेवणानंतर आपण स्वतचं घ्यायचं असा काहीतरी रिवाज म्हणजे लोकं पंक्तीत हात धुवत नाहीत असा सूर मी ऐकला म्हणून पाणी देत नाहीत... 

असो... तर लग्न वैगेरे झालं आणि आम्ही बाबाजीच्या बहिणीकडे म्हणजेच नकुकडे निघालो तिथून पुन्हा चंदनापुरीला जायचं होतं, चंदनापुरीत गेल्यावर दुकानात गेलो आणि बारकीला त्यानं खायला घेतलं नकु शेतातील घरात राहत होती, आम्ही गावातून पुन्हा शेतातील घराकडे वळालो नकु गावात लग्नाला गेली होती, आम्ही त्यांच्या घरी गेलो तर तिचा भाया गव्हाला पाणी भरत होता, तेवढ्यात तिची सासू आली वैभवला पाहून म्हणाली कधी आले तो म्हटला आताच आलोय...

आज्जीचं बोलणं गोडवं होतं... घरी आलो आणि तिनं तांब्याभर पाणी सर्वाना दिलं तोपर्यंत नकु आली मग नकुच्या पोरीच्या हातात बाबाजीनं खायचं दिलं तोपर्यंत नकुनं चहा नंतर पोहे दिले व आम्ही विचारपूस करून पुन्हा बाबाजीच्या सासुरवाडीला कौठे धांदरफळला आलो सायंकाळचे ७ वाजले होते, नंतर आम्ही घरात बसलो ९ वाजता पुन्हा लगीन घरी जेवणासाठी गेलो तिथे वरात होती, वरातीकडे जायला येता आलं नाही, कारण बाबाजीचं लहाण पोरगं आम्ही जाईस्तोपर्यंत झोपलं नाही, तो पण जागाच आणि आम्ही पण जागेच होतो, रात्रीचा आराम केला दुसऱ्या दिवशी आम्ही रविवारी निघण्याच्या तयारीत होतो कारण मला कामावरून फोन यायचे पण पाहुण्यांचा आग्रह असल्याने रविवारचा प्लान बदलला आणि आमचा मुक्काम ठरला...सकाळी बाबाजी आणि आम्ही गावातीलच रामेश्वर मंदिराचे दर्शन घ्यायला गेलो जबरदस्त मंदिर होतं, तिथच व्यायाम करण्याचे साधण होती, पाळणा, झोका, घसरगुंडी आम्ही त्याचा आनंद घेतला आणि रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही तडक दुसऱ्या कौठे धांदरफळमधून बाहेर पडायला लागलो त्याच्या बारक्या पोराला दवाखान्यात दाखवलं आणि आम्ही घरी गेलो जेवण करून आम्ही फिरायला जायचं म्हणून विचार करतानाच बाबाजी म्हटला जवळच इथं पेमगिरीला सर्वांत मोठा वड आहे तो पहायला जाऊ... 

ठरलं तर दुपारी काही तरी बारा वाजता आम्ही घरातून निघालो .....आम्ही पेमगिरीच्या दिशेनं निघालो गाडीवरून जाताना संपूर्ण परिसराचा आनंद घेत घेत बागायती परिसर पाहून किती बरं वाटलं...गावं छोटी आहेत परंतु विकास मोठा आहे पुढील गावात गेल्यावर आम्ही एकाला विचारलं पेमगिरी अजून किती लांब आहे त्यानं सांगितलं तासाभराचा रस्ता आहे, मग आम्ही निघालो पेमगिरीला ग्रामिण भाग असला तरी बागायत क्षेत्रामुळे मन कसं प्रफुल्लित राहतं हे या भागात आल्यानंतर कळतं, आम्ही पेमगिरीचा रस्ता धरला रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा होता पेमगिरीत गेल्यानंतर एक दोन जणांना आम्ही विचारलं की, वडाचं झाडापाशी येथून कसं जायचं तर त्यांनी सांगितलं गावाच्या पाठीमागून एक वेस लागते तिथून आत गेल्यावर वडाचं झाड दिसेल तसंच आम्ही पुढे निघालो पुढे रस्ता बराचसा कच्चा व खडी उखडलेल्या स्वरूपात आहे, मात्र तिथे पोहोचल्यानंतर अतिशय घनदाट अरण्यात गेल्यासारखं वाटतं आत गेल्याबरोबर अतिशय शांत परिसर होता, आम्ही आत गेल्याबरोबर वडाचे फोटो काढू लागलो, वडाच्या झाडाच्या मुळापाशीच एक देवस्थान दिसले, त्याचं नाव जाकमत बाबा असं होत, आम्ही बराच वेळ बसलो म्हटलं येथील माहिती घ्यावी तेवढ्यात एक सत्तरीच्या आसपास आज्जीबाई दिसली, आज्जी तिथल्या देवाची पुजा वैगेरे करत असल्याची माहिती मिळाली, मला माहिती घ्यायची म्हणून मी सुरूवातीला आज्जीला विचारलं आज्जी वडाची माहिती द्याल का तशी आज्जी म्हणाली या तुम्हाला माहिती देते पण देवाच्या जवळ तिथे ओट्यावर या सुरूवातील भिती वाटली पण धाडस केलं तोपर्यंत बाबाजी आणि वैभव बाहेरच बसले होते, पत्र्याचे शेड मुळापाशी केलेले होते, तिथे चार पाच शेंदराचे देव व एक वाघ व वाघाला मारणारा एक रामोशी व त्याची बायको असा परिवार दिसला. आज्जीला माहिती विचारली तशी आज्जीने माहिती दिली, की, समोरच्या डोंगरावर मोठा दगड दिसतोय तिथं वाघाने पाच लोकांना मारले होते मग त्यांच्या बद्दल बदला घेण्यासाठी हा रामोशी गेला व वाघाला मारलं व त्याची बायको त्याला पाणी घेऊन आली इथपर्यंत माहिती मिळाली. आज्जीला वीस रू दिले, आज्जीचा उदरनिर्वाह अशा पध्दतीने होतो असं तिने सांगितले, हा संपूर्ण परिसर तीन पावणेतीन एकरच्या आसपास या महाकाय वटवृक्षाने वेढलेला आहे, या देवाची यात्रा उन्हाळ्यात चैत्रामध्ये असते, असंदेखील आज्जी सांगत होती, हा परिसर पाहत असताना दोन प्रेमी तिथे येताना दिसले देवाच्या पाया पडून ते समोरच्या मुळ्यांवर जाऊन बसले तशी म्हातारी आ्ज्जी वैतागून म्हणाली ही अशी जोडपी येतात इथं फार जपायला लागतं मी त्यांना हूसकून देत असते, एका दृष्टीने ते बरोबर आहे, असं आम्ही म्हणालो व आज्जीचा निरोप घेऊन बाहेर येत असताना एक पाटी दिसली ती ट्रस्टची होती, तिचा फोटो काढला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.... 

क्रमशः 

राहिलेले वर्णन पुढील भागात..... 

लेखनः- सतिश संतोष शिंदे.

Post a Comment

0 Comments