Type Here to Get Search Results !

युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन(NGO) खारपाडा पेण आणि Smile & Shine Dental clinic Johe यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दातांची तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न...



मोफत दातांची तपासणी शिबिराचे आयोजन युवा फ्रेंडस्  सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी शिवस्मारक वाचनालय खारपाडा पेण येथे रविवार, दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डी वाय फाउंडेशन) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री योगेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले. डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सल्लागार श्री प्रकाश केणे साहेब यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून सल्लागार श्री अनंता कोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनचक्र न्यूज चॅनेल आणि साप्ताहिक जनचक्र वार्ता संपादक दिनेश म्हात्रे सर, डी जिल्हा अध्यक्ष यश घरत,  धिरज माळवी, ज्येष्ठ विधीज्ञ मनोहर पाटील साहेब, विद्यमान सरपंच सौ.नेत्रा महेंद्र घरत, उपसरपंच संजय घरत उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा ताई समेळ, माधुरीताई घरत, भारतीताई पाटील, महिला अध्यक्षा सौ.मयुरी कैलास घरत, शिवकन्या ओवी कैलास घरत, ज्येष्ठ समाजसेवक पी पी मोरे, महिला संघटिका- माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.छाया दत्तात्रेय घरत, श्री.दत्तात्रेय जनार्दन घरत, शिवसैनिक नितीन घरत, ग्रामपंचायत सदस्या रसिका ठाकूर, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष रामचंद्र ठाकूर,  ग्रामपंचायत सदस्य निशाकर घरत, आण्णासाहेब श्री कमलाकर बाबू घरत, आईसाहेब सौ.निर्मला कमलाकर घरत ग्रामस्थ आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या शिबिरासाठी Smile & Shine Dental Clinic Johe च्या डेंटिस्ट डॉक्टर चैत्राली कडू मॅडम, डॉक्टर श्रध्दा पाटील मॅडम आणि डॉक्टर साहिल थवई सर, असिस्टंट सिमरन डाऊर इत्यादी तज्ञ डॉक्टरांची टीम आणि श्री विजय रघुनाथ कडू उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी माझे मितेश पाटील यांचे सहकार्य लाभले. या अनोख्या उपक्रमाबद्दल खारपाडा पंचक्रोशीतील नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे निर्मला कमलाकर घरत यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments