Type Here to Get Search Results !

आय ए एस तर्फे शनिवारी नवरात्री वोकेथॉन चे आयोजन, 300 धावपटूंचा सहभाग



शारदीय नवरात्र उत्सव निमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे संत तुकाराम ब्रिज, रावेत ते चतुर्श्रुंगी देवी, पुणे अशी दरवर्षी घेण्यात येणारी 21 किलोमीटर वोकेथॉन चे आयोजन करण्यात आले, सदर वर्ष सातवे वर्ष आहे यावर्षी 3०० हून आधीक जणांनी  सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व सहभागी धावपटूंनी संध्याकाळी 7 वाजता संत तुकाराम ब्रीज, रावेत येथे जमले होते. उद्योजक निलेश देवरे, प्रदीप टाके, अविनाश चौगुले तसेच आयएएस  गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.



सर्व सभासदांनी संत तुकाराम ब्रीज रावेत - डांगे चौक - काळेवाडी फाटा - जगताप डेअरी चौक - औंध गाव - पुणे विद्यापीठ असा चालत प्रवास केला. 



पुणे विद्यापीठ परिसरामध्ये महाप्रसादाची सोय इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे करण्यात आली होती., पुणे पिंपरी चिंचवड मधील विविध भागातून धावपटूंनी सहभाग घेतला. यावेळी दुर्गा माता यांच्या नावाचा जयघोष करत यांना मान वंदना देण्यात आली. 



नियोजना मध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटी चा  गिरीराज उमरीकर  रमेश माने , अजित गोरे , प्रमोद चिंचवडे , अविनाश चौगुले, श्रेयस पाटील, विवेक कडू, सुनील चाकू , रवी पाटील, अमित पवार, सुशील मोरे , प्रशांत तायडे , अभिनंदन कासार, मदन शिंदे, संदीप परदेशी, मारुती विधाते तर कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.



Post a Comment

0 Comments