चारोळ्या
ना संवाद ना संपर्क
ना कुठली हालचाल
गोंधळ गदारोळात
सध्याच्या जगाचे हाल
खूप काहींसं घडतं
आपणां कळत नाही
दिसतं तेंव्हा आपण -
नीट बघतही नाही
आपणां कळत नाही
तेंव्हा गप्पच बसावं
कळेल तेंव्हा आपण -
खरं सांगून टाकावं
आपण जसे वागतो
तशी आपली लायकी
वाईट वागाल तर -
लोक काढती लायकी
लायकी म्हणजे काय ?
आपली खरी ओळख
आपल्याच स्वभावाचं
ज्वलंत परिपत्रक
कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत।ना .कामून )
०० मो .नं . ०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments