Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी 'दिवस तुझे हे फुलायचे' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )

जुन्नर: श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे विद्यार्थिनी कल्याण मंडळ उद्घाटन निमित्त प्रसिद्ध निवेदिका,व्याख्यात्या,लेखिका,

प्रवचनकार व समुपदेशक मा.सौ.शीतल श्रीपाद ठुसे यांचे "दिवस तुझे हे फुलायचे"या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थिनींना नैतिक मूल्ये कशी जोपासावी,आई-वडील व शिक्षक यांच्या विषयी आदर राखणे,जीवनात संयम, सहनशीलता,क्रियाशीलता,

वाढविणे,स्वतःची सुरक्षितता कशी राखावी याविषयी मार्गदर्शन केले.आपले जीवन ही देवाची देणगी असल्याने ते योग्य रीतीने घडविणे हे आपले कर्तव्य आहे.मुलींनी संस्कारक्षम आचरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.



याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी मा.प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.एम.बी.वाघमारे, 

उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी, ज्युनिअर महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या व समन्वयक प्रा.पी.एस.लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते, एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.एस.एम.इंगळे, कला विभाग प्रमुख प्रा.आर.एस कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.ए.पी. ढोले तसेच अनेक प्राध्यापक वृंद उपस्थित होते. प्रा.सौ. के. के. शिंदे यांनी प्रास्ताविक, प्रा. सौ.एस.डी.सोनार यांनी सूत्रसंचालन, प्रा. एम. आर. शेलार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रा. टी.ई. लोखंडे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या सर्व सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments