Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत



चारोळ्या

आपण माणूस तर -

माणसासम वागू या

नदीसम आपणही

नित्य वाहते जाऊ या


माणसा , माणूसच तू -

माणसासवेचि वाग

तसं वागलास तर -

कवेत घेईल जग


ना कुठे ठाव रे माझा

ना कुठे माझा ठिकाणा ?

जगतो आहे ,परंतू -

जगणं एक बहाणा


विश्वास ठेवावा असा -

माणूसच सापडेना

जग माणसांचं पण -

माणूस कुठे दिसेना 


आपले कोण म्हणून -

जग सांगत मी जावे ?

आपले म्हणतो ,पण -

आपलेसे कां न व्हावे ?

 कवी - सूर्यांबिका सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments