जि. प. प्राथ.शाळा कुमशेत येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
वाचन दिनानिमित्त शाळेत बालसभा घेण्यात आली. भारतरत्न डाॅ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ पुस्तकांचे विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
३आक्टोबर २४ रोजी नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मातृभाषेचा मायबोलीचा गोडवा वाढविण्यालाही वाचनाची आवड प्रेरणा निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थी पुस्तके ग्रंथ साहित्य काव्य वाचनाकडे वळविण्यासाठी कुमशेत शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले.
-डाॅ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाचन करण्यात आले.पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
वाचलेल्या पुस्तकाबद्दल अभिप्राय घेण्यात आले.इ.२री ते ४थी च्या विद्यार्थींनी ग्रंथालयातील आवडत्या पुस्तकांचे वाचन केले.वाचन कट्ट्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अभिजात मराठी भाषा गोडवा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कुमशेत शाळेत दररोज दुपारी मधल्या सुट्टीत पाच मिनिटे पुस्तके वाचन, सेल्फी कट्टा वाचन, काव्यवाचन,बातमीवाचन,चित्रवाचन इ उपक्रम वर्षभर चालू आहेत.
श्याम लोलापोड सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगितले.घोडे सरांनी वाचन विषयी स्वरचित कविता सादर केली.व अभिजात मराठी भाषा विषयी मार्गदर्शन केले.माजीअंगणवाडी ताई डोके बाईंनी वाचनाचे फायदे सांगितले.या बालसभेचे अध्यक्ष स्थान प्रज्वल नाईकवाडी याने भुषविले.तर श्रुती डोके हिने सर्वांचे आभार मानले.



Post a Comment
0 Comments