Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



@ चारोळ्या @

जीवन म्हणजे काय - ?

मृत्यूलाही कळू यावे 

कोण कसा जगतोय - ?

तेही जगून पहावे


असं जीवन जगा की -

मृत्यूच यावे शरण

वरून मृत्यू म्हणावे -

' मलाही शिकू दे जीवन '


तुझा हसरा चेहरा -

किती दिलकश होता 

आजला तोच चेहरा -

असा कां काळवंडला ?


नुकसान सोसताना -

मिळालेला धडा शिका

भविष्यात पुन्हा कधी -

नाहीच होणार चुका


मनासारखे झाले की -

मन प्रसन्न वाटते

मनाविरूध्द झाले की -

मनी चीडचीड होते

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो . नं . 07620540722

Post a Comment

0 Comments