Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत आजच्या चारोळ्या वाचा



चारोळ्या

मन हळवं असावं

दुबळं मात्र नसावं

कठीण प्रसंगी पण -

सामोरे जाण्या शिकावं


डोळे भरून बघता

डोळेच भरून आले

आत्ताच्या डोळ्यात माझ्या -

डोळाभर तूच झाले


मनात ठरवलं की -

सारं काही शक्य होतं

नसेल इच्छा आकांक्षा-

जीण्याला काय किंमत ?


अंधार कोळून प्यालो

तरी उजेडच नाही

लख्ख उजेड तरीही -

अंधार कां जात नाही ?


कुणी बोलायचे नाही

कुणी हसायचे नाही

डोळे वटारूनपण -

कुणी पहायचे नाही

@ कवी -  सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments