Type Here to Get Search Results !

लेख -निर्णय तिच्या आयुष्याचा.-लेखिका - सौ. शितल सतिश शिंदे



सीमा अतिशय गुणी व आईवडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली मुलगी. घरातली एकुलती एक म्हणून तिचे लाड पुरवले जायचे. पण शिस्तीच्या नियमांच्या बाबतीत मात्र काटेकोरता असायची. जो या विरूद्ध जाईल तो संपलाच समजा. पण तितकाच सिमावर त्यांचा विश्वास देखील होता. आणि तो ती कायम जपत असे. हळूहळू तिची वैचारिक पातळी वाढू लागली. शिक्षणात तर ती अव्वल होतीच. पण सामाजिक दृष्ट्या तिला असे वाटू लागले की आपल्या घरातील जे नियम आहेत ते बदलले पाहिजे. उदाहरणार्थ. स्त्रियांनी मोठ्यांच्या म्हण्याच्या पुढे त्यांचे मत ही व्यक्त करू नये. घरातील मोठा व्यक्ती जो निर्णय घेईल तोच खरा. सीमाला काही गोष्टी आता बंधने व चुकीच्या वाटू लागल्या . आईवडील नातेवाईक व इतर सगळेच जातधर्म या वरून व्यक्तीची पारख करत. अन् दुसऱ्या जातीतील व्यक्तींना तुच्छच मानले जाई. हे ती वारंवार पाहत होती. 

काही गोष्टी सामजिक दृष्ट्या तिला बदलायच्या होत्या. म्हणून ती जन्मभर बिनविवाह राहण्याचा निर्णय घेते. किंवा घरच्यांना सांगते की , माझा विवाह हा जात पात बघून नसावा माणुसकी बघून असावा म्हणून मी जो मुलगा निवडला आहे. त्याच्याशी विवाह लावून द्यावा. घरी मात्र मनापासून कुणीच या गोष्टीला संमत होत नाही. केवळ सीमा ने बरंवाईट करू नयेआणि भावनिक दृष्ट्या न हट्ट म्हणून,तरी तिला “तू निवडलेल्या मुलाशी लग्न लावून दिले जाईल” असे सांगितले जाते. विवाहाची तयारी जोरदार सुरू असते. सीमा अतिशय खुश असते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. पण आता जे घडणार होते याची कुणालाच कल्पना नव्हती. सीमा इकडे लग्नाच्या जोड्यात तयार झाली असते. काहीतरी विचित्र घडेल असे तिला मधून मधून वाटत होते. अन् इकडे सीमाचा नवरा रणजित याचा अपघात झाल्याची घटना तिच्यापर्यंत पोहचवली जाते. आता तिच्याशी कोण लग्न करणार म्हणून त्याच्याजागी दुसरा मुलगा उभा केला जातो. दिसायला तो जरा कुरुपच असतो. पण पर्याय नसतो. सीमा फक्त घरच्यांसाठी मनावर दगड ठेवून लग्न करते. 

एक महिन्यातच तिचे ज्या मुलाशी लग्न झाले त्याचे खरे रूप बाहेर येते. पैसा संपत्ती सगळ काही असत पण तिचा नवरा तिला सतत मारहाण करत असे. आणि सीमाचा घरच्यांकडून हुंडा मागणी करत असे. तिच्यावर अश्लील आरोप लावत असे. सीमा मात्र काहीच सांगू शकत नव्हती. सीमा काही दिवसांतच बाळंतीण होणार होती. तिचा नवरा तिच्यावर नको ते आरोप लावतो “ हे मूल तू ज्या रंजितशी लग्न करणार होती त्याच मुल आहे. तू इथून तुझ काळ तोंड घेऊन निघून जा.” सीमा तशीच नववा महिना असताना कशी तरी घराबाहेर पडते. ती आईवडिलांकडे निघणार तितक्यात तिला एक पत्र पोस्टमन घेऊन जाताना दिसतो. आणि तो सीमा बद्दलच विचारत होता. तिने ते पत्र उघडुन पाहिले. 

‘ प्रिय सीमा          

आपल्या या लग्नास तुझ्या घरच्यांचा मनापासून होकार दिसत नाही. मला तू खूप आवडतेस. मला तुझा निर्णय पटला. तुझ्या घरच्यांनी तुझा विवाह तुमच्या जातीतील एका मोठ्या संपत्ती असणाऱ्या मुलाशी लावण्याचा प्लॅन केला आहे. तो मुलगा व्यसनी आणि शरीर सुख भागविणारा आहे. मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुला यातून नक्की सोडणविनार .मी तसा कशाला घाबरत नाही. पण तुझ्या घरच्यांनी मला आदल्या दिवशी धमकी दिली होती ती ही मी ऐकली नाही. मी लवकरच तुझ्याजवळ येत आहे…

                                    तुझाच ,

                                   रणजित


अन् त्याचवेळी कार मधून येत असताना त्याचा अपघात हा प्लॅन करून मर्डर म्हणून केलेला आहे हे तिला पोलिस चौकशी झाल्यानंतर खूप उशिरा तिच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहचतात.तिला हे दुःख असह्य होते. इतक्या मोठ्या आघातामुळे तिला जगण्यासाठी काहीच अर्थ उरत नाही. कारण तिच्या विश्र्वासास घरच्यांकडून खूप मोठा तडा गेला होता. तिच्या पोटातील बाळ ही मरण पावते.


घेतलेला निर्णय कुणाचा अयोग्य होता?


सीमाचा घरच्यांचा रणजितचा की सीमाचा..

   

सीमाचा तिच्या बाळाच्या आणि रनजितच्या मृत्यूस कारणीभूत कोण? 


समाज नातेवाईक आईवडील की सीमाचा नवरा..

Post a Comment

0 Comments