चारोळ्या
आज जग कसं आहे
सर्वांना ठाऊक आहे
तरी प्रत्येक माणूस -
आहे तिथे ठीक आहे ?
जगाला कितीही सांगा
माझंच खरं म्हणतं
आपली चूक नसता -
जग कां चूक म्हणतं ?
सध्याचं जग कुणाला
चांगलं म्हणत नाही
वाईटाला मात्र जग -
चांगलं म्हणत राही
जग चांगलंही आहे
जग वाईटही आहे
कोणा कसा अनुभव -
तसा तो सांगतो आहे
डाग नसलेला जगी
सांगाल कां कोण आहे ?
सूर्य इतका तेजस्वी -
त्याला पण डाग आहे
@ कवी - सूर्यांबिका सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून
मो .नं 07620540722

Post a Comment
0 Comments