Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा -लेखक दिलीप कजगांवकर लिखित साडी पार्लर कथा



नेहाच्या सांगण्यावरून राजने साडी पार्लरला फोन केला आणि साडी नेसवून देण्याचे चार्जेस विचारले.


सर, मी तुम्हाला चार्जेस सांगते परंतु त्या आधी तुम्हाला काही माहिती द्यावी लागेल.


मॅमचे वय किती? म्हणजे ३० पेक्षा कमी, ३१ ते ४० की ४० पेक्षा जास्त? 

राज - ३० पेक्षा कमी


मॅम सर्व्हिस करतात की हाऊस वाईफ?  

राज - सर्व्हिस


साडी नवीन आहे की या आधी वापरलेली?

राज - नवीन


साडीची किंमत १०,०००/-  रुपयांपेक्षा कमी की जास्त?

राज - जास्त


कार्यक्रमाची अपेक्षित उपस्थिती ५० हून कमी की जास्त?

राज - जास्त


सर, १,००० + १२० जी एस टी = १,१२०/- रूपये लागतील


तुम्हाला सर्व्हिस नॉर्मल हवी की एक्सप्रेस?

नॉर्मल म्हणजे ऑर्डर घेतल्यानंतर दोन तासांत साडी नेसवून मिळेल, एक्सप्रेस म्हणजे अर्ध्या तासात.

एक्सप्रेसला ५००/- रूपये जास्त लागतील.


आणि हो, मॅम म्हणजे तुमची बायको की मैत्रीण?

बायको असल्यास पक्के बिल मिळेल आणि मैत्रीण असल्यास कच्चे.


राज - कच्चे बिल असल्यास जी एस टी लागणार नाही ना?

सर, ती रक्कम आमची टीप, गप्प बसण्याची.


साडी सोडून देण्याची सर्व्हिसही तुम्ही देतात का? राजने कुतुहलाने विचारले.


नाही सर, जनरली याची गरज पडत नाही कारण मित्र किंवा नवरे मंडळी ते काम सवडीने आणि आवडीने करतात.


साडी सोड, साडी सोड म्हणत राजने नेहाला साडी सोडण्याचा आग्रह धरला. नेहा, तु साडीपेक्षा ड्रेसमध्येच जास्त छान दिसतेस म्हणून साडी नेसणे सोड असे पुनः पुनः सांगत.


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६



Post a Comment

0 Comments