Type Here to Get Search Results !

मंचर येथील नवरात्रोत्सवास शेकडो भाविकांसह दांडियास प्रचंड प्रतिसाद



प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )

मंचर दि १० ऑक्टोबर 

आंबेगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मंचर शहरात दांडीया रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात नवरात्रोत्सव साजरा होत असुन सर्वच ठिकाणी रास दांडिया,लकी ड्रॉ, पैठणीमुळे महिलांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकासंघटिका प्रा.सुरेखाताई अनिल निघोट, भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्राध्यापक अनिल नारायणशेठ निघोट, शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे, कल्पना ताई बाणखेले,महिला आघाडी शहर समन्वयक शितलताई बागल यांनी विविध मंडळांच्या महाआरत्या घेतल्या.



यात श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंडळात महिलांनी नवदुर्गा सादर केल्या ज्यात परीक्षक म्हणून शिल्पा बनबेरु, स्मिता कामठे, शितल शिंदे, नुतन कानसकर यांनी काम पाहिले.अध्यक्ष वंदना मोढवे,सोनल महाजन, जगदीश घिसे, पंडित माशेरे यांनी नियोजन केले,तर श्रीमंत छत्रपती मंडळांच्या भव्य नवरात्रोत्सवात तुषार थोरात, राहुल थोरात यांनी सर्वांचे स्वागत केले. वजीर प्रतिष्ठान चे गोकुळ बाणखेले, बाळासाहेब बाणखेले,राम थोरात यांनी ऊत्तम नियोजन केले . अधिरा प्रतिष्ठान च्या रास दांडिया सर हजारोंची ऊपस्थिती होती लक्ष्मण थोरात, आकाश थोरात, माजी ऊपसरपंच धनेश मोरडे यांनी अत्यंत आकर्षक व सुंदर व्यवस्थेसह आयोजन करुन मंचर परिसरातील युवकांना आकर्षित केले आहे.तर नवसाला पावणारी शितलामाता नवरात्रोत्सवास गोकुळ शहा, संजय थोरात, बाळासाहेब थोरात, कल्पना थोरात, ज्योती बोंबले, अक्षय थोरात, मुकेश अहिरे, मंगेश जावळे, आश्विनी वाळुंज, मयुरी थोरात, मंगेश जावळे, कल्पना थोरात, सौरभ राजेश थोरात यांनी ऊत्तम नियोजन केले आहे.तर अमर शिवराज्य मंडळाचे ऊपसरपंच महेश थोरात,माऊली लोखंडे, आकाश ससाणे, प्रसाद बोर्हाडे, पल्लवी नवले,प्रशांत थोरात,सुनिता घोलप, वर्षा थोरात, तेजश्री थोरात,काळुराम थोरात, रमेश थोरात, मोहन लोखंडे, गणेश थोरात, मोहन थोरात, निलेश थोरात यांनी सर्वांचे स्वागत करुन पैठणी व ईतर बक्षिसांचे प्रा. सुरेखाताई निघोट यांचे हस्ते वितरण केले.यावेळी त्यांनी विविध मंडळांच्या भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments