प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तळेरान या गावांमध्ये झाले. गोरगरीब जनतेचे, वंचित जनतेचे, विविध भागातील लोकांचे प्रश्न गावामध्ये सुटावेत तसेच विविध योजनांची माहिती व त्यांना लागणारे कागदपत्रे गावा मध्ये प्राप्त व्हावीत यासाठी जनसंपर्क कार्यालय शाखेचे ओपनिंग करण्यात आले. या वर्षी तळेरान गावातील प्रा. शंकर होनाजी घोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी यांच्याकडे विधानसभेचे तिकीट मागणी केलेली आहे. यांना कुटुंब म्हणून व उमेदवारी मिळाल्यास तळेरान गाव सज्ज आहे व यासाठी आतापासूनच निवडणुकीची तयारी करण्यासाठी कार्यालय आपल्या गावातच पाहिजे यासाठी शाखा उघडण्यात आली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. या कार्यक्रमास तालुक्याचे जेष्ठ नेते शरदरावजी लेंढे साहेब, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जेष्ठ नेते दिलीपराव कोल्हे, तालुका अध्यक्ष तुषार भाऊ थोरात, तालुका उपाध्यक्ष तुळशीराम भोईर,जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, श्याम माळी,देवराम डावखर, जयराम मेने,दुंदा घोडे, कोंडिभाऊ भोकटे, चंद्रकांत निसरड, रोहिदास मेणे,सुरेश गोडे, शंकर गोडे,रघुनाथ कोकाटे, काळू घोडे, कुशाभाऊ गोडे,बबन भवारी, तसेच विधान सभेचे उमेदवार प्रा. शंकर होनाजी घोडे,गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. शंकर घोडे म्हणाले की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा हा जुन्नर तालुका आहे. आतापर्यंत प्रत्येक इलेक्शन मध्ये आदिवासी समाजा तील एक कठा मतदान हे महाविकास आघाडीला केलेले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये शंभर टक्के शरदचंद्रजी पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार होईल यात तिळमात्र शंका नाही. उद्घाटन प्रसंगी तुषार भाऊ थोरात,सत्यशील शेरकर, लांडे गुरुजी, शरदरावजी लेंडे, अंकुश अमले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोहिदास गोडे साहेब यांनी केले तर आभार चंद्रकांत साबळे साहेब यांनी मानले.
Post a Comment
0 Comments