चारोळ्या
हेल्थ कॅान्शस पत्नीने
गोडाचा धसका घेतला
गोड खाण्याबरोबरच
गोड बोलवाही सोडला
लिहीणार्याने लिहित जावे
वाचणार्याने वाचत जावे
वाचता वाचता एकदा तरी
लिहीणार्याला लाईक द्यावे
आज मन भूतकाळातून
वर्तमानात यायला तयार नव्हते
कैक वर्षांपूर्वीच्या तुझ्या आठवणींचा
आस्वाद घेण्यात ते मग्न होते
एकाकी माझ्या आयुष्यात
नकळत तू आलीस
तुझे अस्तित्व जाणवताच
कुठे निघून गेलीस?
आखुड मोकळे केस पाहून
पुरुष वर्ग खुलला
केसात स्थान नाही म्हणून
गजरा मात्र रुसला
पाहुण्याचे चुंबन पद्मिनीने घेतले
शिल्पाचे चुंबन पाहुण्याने घेतले
दोन्ही वेळी फक्त चर्चा झाली
मिकाला मात्र शिक्षा झाली
अचानक ती भेटली
आयुष्याला दिशा लाभली
नकळत ती निघून गेली
दिशाही, दिशाहीन झाली
हरू नये म्हणून
सतत धावलो
धावता धावता
चालणेच विसरलो
माझ्या कवितेची पुस्तके
अगदी रातोरात खपली
गावात शोभा नको म्हणून
बायकोनेच विकत घेतली
वैतागून माझ्यावर
बायकोने रेडिओ सुरू केला
गरीब बिचारा रेडिओ
माझ्याच कविता ऐकवू लागला
या अतिसुंदर क्षणी
विसर वाईट आठवणी
आवडलेले सर्व काही
विसरू नको कधीही
सतत असणाऱ्या सोबतीला
प्रश्न विचारला सावलीला
सांग कधी वागलो
मी सोडून संस्कृतीला?
मेहुणीचा इरादा होता
आठ दिवस राहाण्याचा
माझा कविता ऐकविण्याचा विचार ऐकून
निर्णय घेतला लगेचच निघण्याचा
मी नसायचो कधीच
तुझ्या मागे मागे
तुच तर असायची सदैव
माझ्या पुढे पुढे
नेहेमीच असतो
घाबरा घुबरा
तोच का गं
तुझा नवरा?
गणिताच्या मास्तरांना
समजले नाही वास्तव
आखूड कपड्यांची किंमत
का असते अवास्तव?
दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६
Post a Comment
0 Comments