Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात भोंडला व दांडियाचे आयोजन.



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )

दि.११ ऑक्टोबर २०२४

जुन्नर: श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे ज्युनिअर महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या वतीने भोंडला व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विभागातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.



संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही.बी.कुलकर्णी, प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमारे यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यानंतर विद्यार्थिनींनी 'ऐलमा पैलमा गणेश देवा' म्हणत भोंडला सादर केला व नंतर हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर दांडियाचा मनमुराद आनंद लुटला.



याप्रसंगी सिनिअर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.डी.चौधरी,ज्युनिअर महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा,पर्यवेक्षक प्रा. एस.ए.श्रीमंते, एम.सी.व्ही.सी.विभाग प्रमुख प्रा. के.जी.नेटके,कला विभाग प्रमुख प्रा.आर.एस.कांबळे,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.ए.पी.ढोले, कार्यालय प्रबंधक सौ मनिषा कोरे व प्राध्यापिका उपस्थित होते. विद्यार्थिनीं समवेत सर्व प्राध्यापिकांनीही दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. याप्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. 

विद्यार्थिनी कल्याण मंडळ प्रमुख प्रा.सौ.के.के.शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार मानले.प्रा.सौ.एम.डी.हाडवळे व प्रा.एस.व्ही.सोनवणे यांनी विद्यार्थिनींना भोंडला व दांडियाचे मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments