प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
खानापूर... ता. जुन्नर येथील शिवनेरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व यंत्रसामग्रीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व नवीन प्रशिक्षणार्थी यांना विविध यंत्रांची ओळख व उपयुक्तता याबद्दलची माहिती संस्थेचे प्राचार्य राजेंद्र आंधळे यांनी दिली.
जागतिकीकरण व संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून मानवी व्यवहारातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलांना अनुकूल पिढी घडवण्याचे काम व भविष्यातील स्वप्न साकार होण्यासाठी भविष्यकाळात रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण देण्याचे काम शिवनेरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था करत असल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे यांनी मांडले.
आयटीआय पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या संधी व संस्थेमध्ये असणारे विविध ट्रेड याबद्दलची माहिती मुख्य निदेशक प्रा. संतोष पाचपुते यांनी दिली.
यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी, तसेच कॅम्पस इन चार्ज प्रा. राजेंद्र मुरादे, प्रशासकीय अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर पटाडे, मुख्याध्यापक श्री संजय मिश्रा, फार्मसी विभागाचे प्राचार्य श्री.सचिन नागदेवे,संगणक विभाग प्रमुख प्रा. अमोल थोरात, लेखा विभाग प्रमुख श्री सुभाष पापडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments